Chakan : गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवावेत

चाकण पोलिसांचे आवाहन

एमपीसी न्यूज – चाकण (Chakan) पोलिसांनी आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीत गणपती उत्सव साजरा करताना महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी मधील जनसमुदायाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याकरता मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशा सूचना दिल्या आहेत.

Pimpri : लेखकांनो मूग गिळून स्वस्थ बसू नका; लिहिते व्हा’; दामोदर मावजो यांचा सल्ला

चाकण मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला जवळपास ७० ते ८० मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत उपस्थित मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना शासनाच्या नियमाप्रमाणे गणपती उत्सव साजरा करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मंडप बांधताना वाहतुकी संदर्भात काय दक्षता घेतली पाहिजे, ध्वनीक्षेपकाचे नियमांबाबत, डिजेचा वापर न करण्याबाबत, कार्यक्रम ठिकाणी जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमण्यात यावेत याबाबत सांगण्यात आले आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य, कार्यक्रम, कृत्य, देखावे, प्रतिमा व आक्षेपार्ह बॅनर न लावण्याबाबत तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करण्याबाबत सविस्तर माहिती बैठकीत देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी मंडळांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

चाकणचे माजी उपसरपंच अशोक बिरदवडे यांनी उत्सव काळात महिलांच्या सुरक्षेकडे आणि छेडछाड प्रकार रोखण्याकडे अधिक लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी चाकण पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, महावितरणचे अविनाश सावंत यांच्यासह माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, जमीर काझी, काळूराम कड, बाळासाहेब गायकवाड, संध्या जाधव व पोलीस अधिकारी सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्व मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी प्रास्ताविक करताना मंडळांनी काय उपाययोजना कराव्यात या बाबत सविस्तर माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.