Maharashtra : आदिपुरुष मधील ‘ते’ वादग्रस्त संवाद बदलले

एमपीसी न्यूज – आदिपुरुष आणि त्याच्या संवादा बाबतचा वाद आता कदाचित संपुष्टात येईल. (Maharashtra) प्रभू राम, सीता आणि भगवान हनुमान यांच्या चित्रणासाठी अनुपयुक्त भाषा वापरल्याबद्दल चित्रपटाला तीव्र प्रतिक्रिया मिळाली होती.

Pune – आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धांतील राष्ट्रीय विजेत्यांशी २३ जून रोजी संवाद

नकारात्मक प्रतिसादानंतर, दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुनताशीर शुक्ला यांनी संवादांमध्ये असे बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याच्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी ह्या हाय बजेट चित्रपटातील काही बदलांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे अर्ज केला व चित्रपट नियमांच्या नियम 33 अंतर्गत, सीबीएफसी ने हा अर्ज स्वीकारला व  संपादित संवादांना मान्यता दिली. चित्रपटाच्या जुन्या आवृत्ती मध्ये जे वादग्रस्त संवाद होते त्यामध्ये पुढली प्रमाणे फरक केले आहेत-

– तू अंदर कैसे घुसा..तू जनता भी है कौन हूं मैं – तुम अंदर कैसे घुसे..तुम जानते भी हो कौन हूं मैं.

– कपडा तेरे बाप का, तो जलेगी भी तेरे बाप की – कपडा तेरी लंका का, तो जलेगी भी तेरी लंका.

– जो हमारी बेहेनो…उन्की लंका लगा देंगे – जो हमारी बेहेनो…उन्की लंका में आग लगा देंगे.

– मेरे एक सपोले ने तुम्हेरे इस शेषनाग को लंबा कर दिया, भरा पडा है – मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेषनाग को संपत कर दिया, भरा पडा है.

16 जून 2023 रोजी चित्रपट प्रकाशित झाल्यापासून चित्रपटाचे लेखक मनोज मुनताशीर शुक्ला प्रचंड चर्चेत आहेत. सोशल मीडियावर तसेच करणी सेनेकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे शुक्ला यांना आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. लेखकाने त्याला मिळालेल्या धमक्यांबद्दल बोलण्यासाठी ट्विटरवर ट्विट केले होते व त्यांचा कामावर हल्ला केल्याबद्दल निराशा व्यक्त केली होती.

त्यांनी लिहिले, “मी आदिपुरुषमध्ये 4000 हून अधिक ओळींचे संवाद लिहिले, 5 ओळींमुळे काही भावना दुखावल्या. त्या शेकडो ओळींमध्ये जिथे श्री रामांना गौरवण्यात येत होते, माँ सीतेच्या पावित्र्याचे वर्णन होते, त्या संवादांची स्तुतीही व्हायची होती, जी मला का मिळाली नाही.

मी माझ्या संवादांच्या बाजूने भरपूर युक्तिवाद देऊ शकतो, परंतु यामुळे तुमचे दुःख कमी होणार नाही. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि मी ठरवले आहे की, जे काही संवाद तुम्हाला खटकत आहेत. आम्ही त्यांना सुधारित करू, आणि ते या आठवड्यात चित्रपटात जोडले जातील,”

 

embedded tweet – https://twitter.com/jBhhVj1/status/1671207616708755456?s=20

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.