Chinchwad : क्रूर ‘रँड’चा वध करणाऱ्या तीन बंधूंची गाथा

एमपीसी न्यूज – प्लेग आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटीश (Chinchwad) सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अध्यक्ष म्हणून वॉल्टर चार्ल्स रँड या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्याला विशेष अधिकारही दिले गेले. त्याचा त्याने गैरवापर केला आणि सर्वसामान्य जनतेचा छळ सुरु केला. या रँडचा चापेकर बंधूंनी पुण्यातील गणेश खिंडीत गाठून वध केला. ती तारीख होती… 22 जून 1997.

इंग्लंडच्या राणीच्या हिरक महोत्सवाच्या दिवशी ब्रिटीश सरकारला चापेकर बंधूंनी जोरदार तडाखा दिला होता. सन 1857 नंतर झालेली ही पहिली सशस्त्र क्रांतिकारी घटना होती. इतिहासाच्या या घटनेबद्दल आणि चापेकर बंधूंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांवर इतिहास अभ्यासक अभिषेक उर्फ प्रेम वाघमारे यांनी या लेखाच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे.

1857 नंतरची सर्वात पहिली सशस्त्र क्रांतिकारी घटना..1897 मध्ये पुण्यात प्लेग या साथीच्या रोगने थैमान घातले होते. फेब्रुवारी महिन्यातच 600 पेक्षा जास्त प्लेगमुळे माणसांचा मृत्यू झाला होता. प्लेगने आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. माणसं घाबरून घरे दारे सोडून जाऊ लागली.

प्लेग आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारनी एक समिती स्थापना केली त्या समितीचा अध्यक्ष ‘वॉल्टर चार्ल्स रँड’ या अधिकाऱ्याची नियुक्ती केली व त्याला विशेष अधिकार देऊन टाकले त्या अधिकाराचा रँड व त्याच्या सैन्य कडून मोठया प्रमाणात गैर वापर करण्यात आला तपासणीच्या नावा खाली घरात घुसून वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान करू लागले, हिंदू दैवतांचा अपमान, उघड्यावर विवस्त्र करून तपासणी करणे, बेदम मारहान,हव्या त्या वास्तू जाळून टाकने लोक घाबरून घराला कुलपे ठोकून जाऊ लागले.

Wakad : जप्ती आलेल्या फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा घेतल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

त्यामुळे ती घरे ब्रिटिश सैनिक लुटू लागले. इतक्या दिवस चोरीवर भागत होते, पण आता बायकांच्या अंगावर हात टाकण्याची मजल सैन्याकडून होत होती. स्त्रियांवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. अश्या प्रकारे अतोनात छळ हा ब्रिटिश सैन्याकडून व रँडच्या नेतृत्वाखाली सतत चालू होता. हे सर्व ऐकून चाफेकरांच्या अंगाचा तीळपापड (Chinchwad) झाला. टिळक, आगरकर उघडपणे सरकार विरुद्ध आपली भूमिका मांडत होते.

“भीक मागून स्वतंत्र मिळत नाही, त्यासाठी रक्ताचा सडा पाडावा लागतो. बंदूकी ठासून बार कडावा लागतो” हे क्रांतिकारकांना चांगले ज्ञात होते.

जे सत्तेत उच्च पदावर आहेत, त्यांना धक्का दिला पाहिजे तरच गोष्टी बदलतील.. हे क्रांतिवीरांनी जाणले होते. ब्रिटिशांना रँड वध करून जोरदार तडाखा देण्याचे त्यांनी ठरवले.

स्पर्धा कशी असावी याच सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे रँडला पाहिलं की कोण मारणार? यासाठी क्रांतिवीरांमध्ये लागलेली जोरदार चुरस. ‘रँड’ वधच्या आधी दोन वेळा त्याच्यावर हल्ला कण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये क्रांतिवीर काशिनाथ ठकूजी जाधव यांचा सक्रिय सहभाग होता. चाफेकर बंधू आणि काशिनाथ बुवा हे जिवलग मित्र होते. पहिला हल्ला हा कोतवाल चावडीपाशी करण्यात आला. दुसरा हल्ला हा जोगेश्वरीपाशी करण्यात आला. नेम चुकल्यामुळे रँड त्या हल्ल्यातून वाचला त्यानंतर त्याला 12 घोड्यांची सुरक्षा देण्यात आली. कालांतराने ती कमी करणात आली.

22 जून 1897 रोजी राणीच्या हिरक महोत्सववाच्या दिवशी ब्रिटश सरकारला जोरदार तडाका देण्याचा पण चाफेकर बंधूनी घेतला. त्यानुसार पूर्व नियोजन करण्यात आले होते. चतु:श्रुंगी देवीचं दर्शन घेऊन चाफेकर बंधूनी गणेशखिंड गाठली. ठरल्या प्रमाणे वासुदेव गोंद्या आला रे..आवाज करत रँडच्या बग्गी मागे धावत येणार.. पार्टी आटोपून एक एक ब्रिटश अधिकारी आपआपल्या निवास्थानी जात होते.

तेवढ्यात गणेश खिंडीत दबा धरून बसलेल्या चाफेकर बंधू यांना आवाज आला गोंद्या आला रे.. समोरून (बग्गी) टांगा येताना दिसला त्या सरशी बाळकृष्ण चाफेकरांनी बग्गीवर चढून डोक्यात गोळ्या घातल्या, पण परत मोठयाने आवाज आला. गोंद्या आला रे..डोक्यात विचारांचं काहूर माजले होते.

ज्याला मारला तो रँड नव्हता, खात्री पटली रँडची बग्गी जवळ येताच पाठीमागून वासुदेव पळत येताना दिसला. त्याने मोठे बंधू दामोदर यांना इशारा केला. आण्णा रँड.. क्षणाचाही विलंब न करता चित्याच्या चपळाइने दामोदर बग्गीवर चढले रँडच्या पाठीत गोळ्या झाडल्या..

ज्याला रँड समजून मारला तो त्याचा सहाय्यक लेफ्टनंट आयस्टर होता. तो जाग्यावरच ठार झाला. रँड हा पाठीत गोळ्या लागल्याने कोमात गेला. शेवटी 3 जुलै 1897 रोजी ससून हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. चाफेकर बंधू यशस्वी रित्या निसटून मुंबईला गेले.

त्या दिवशी सकाळी पूर्ण पुण्यात रँडला मारल्याची बातमी पसरली..

रँड व आयर्स्टच्या वधामुळे ब्रिटेनपर्यंत या हत्येचे पडसाद उमटले.. तीन महिने उलटून गेले, तरी रँड व आयर्स्टच्या मारेकऱ्यांचा थांगपत्ता ब्रिटिश सरकारला लागत नव्हता. मुंबईवरून विशेष पोलीस अधिकारी ब्रुइन याला पुण्यात रँड हत्येचा इन्वेस्टीगेशन ऑफिसर म्हणून पाचरण करण्यात आले होते.

रँडच्या हत्येच्या मारेकऱ्यांची माहिती देण्याऱ्यास सरकारने 20 हजार रुपयांचे रोख पारितोषिक ठेवलं. या अमिषाला बळी पडून पूर्वी चाफेकर क्लबचे सदस्य असलेल्या द्रविड बंधूनी गद्दारी केली व चाफेकर बंधूची माहिती सरकारला दिली. फितुरी करणाऱ्या गणेश द्रविड व रामचंद्र द्रविड या दोन्ही बंधूस वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी गोळ्या घालून ठार मारले.

दामोदर हरि चाफेकर यांना 18 एप्रिल 1898 रोजी येरवड्यात फाशी देण्यात आली. वासुदेव हरी चाफेकर यांना 8 मे 1899 रोजी फाशी देण्यात आली. महादेव विनायक रानडे यांना 10 मे 1899 रोजी फाशी देण्यात आली. तर बाळकृष्ण हरि चाफेकर यांना 12 मे 1899 रोजी फाशी देण्यात आली.

जगातली अशी एकमेव घटना क्रांतिकार्यासाठी सख्खे तीन बंधू फासावर चढले. अन एकच घरातल्या तीन स्त्रिया एकच वेळी विधवा झाल्या.. या क्रांतिवीरांची स्मरणगाथा तरुण पिढीला स्फूर्तीदायक ठरो.

रँड वधाच्या घटनेवर अभिषेक वाघमारे यांनी रचलेले काव्य  –

प्लेग में बेकाबू हुवा वो
जुलमी ‘रँड’ अत्याचारी
लगाम लगाने सबक सिखाने
आये वीर क्रांतिकारी..

क्रांतिवीरो में शर्त लगी थी..
निशाणा कौन साधेगा
रँड को कौन वधेगा…

दो बार पहले हुवा प्रहार
बार-बार रँड बचता रहा
इस बार का नियोजन न कच्चा था
क्रांतिवीरो का प्रण सच्चा था

घटना वो सटीक घटी,
गोंदया आया रे गुंज उठी
गणेश खिंड में भगदड मछिं
भेदा गया रँड..

ब्रिटिशो में हडकंप हुवा
जैसे धरणी कंप हुवा
ब्रिटेन तक ये बात गई
हात लगा ना कोई

तीन माह बीत गये
अंग्रेज सारे नाकाम हुये
बीस हजार का इनाम लगा
दाव पे ब्रिटिश सम्मान लगा

लालच के शिकार हुये
कुछ गद्दार फितूर हुये
क्रांतिवीर पकडे गये
बताया चापेकर बंधुवो का नाम

देश के खातिर परिवार
अपना भूल गये
इतिहास में पहली बार
तीन सगे भाई
फासी पर झुल गये

कौन सी मिट्टी के
बने थे वो न जाने
आझादी के लिए जान
से खेल गये दिवाने

‘रँड वध’ तो एक नये
क्रांतिकारी युग का आगाज हैं
इन वीर पुत्रो कीं शहादत पर
भारतमाता को भी नाज हैं..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.