Wakad : जप्ती आलेल्या फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा घेतल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज –  तब्बल 1 कोटी 39 लाख रुपयांचे कर्ज घेत त्यांची परतफेड केली नाही. त्यामुळे संबंधीत कंपनीने कर्जदाराचे तीन फ्लॅट सील केले होते. मात्र सील केलेल्या फ्लॅटवर बेकायदेशीर ताबा घेतल्या प्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 4 जून रोजी वाकड (Wakad) येथे घडली आहे.

Pune : उस्मानाबादमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुण्यातील रोटरी क्लब ऑफ पुणे, गांधी भवन यांचा पुढाकार

याप्रकरणी संतोष कांतीलाल शिंदे (वय 41 रा.स्वारगेट) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शेख चांदसाहब हुसेन व त्यांचीदोन मुले यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एम.आर.इंजिनीअरींग चिंतामणी इंडस्ट्रीज इस्टेट यांच्यातर्फे शेख हुसेन यांनी 26 डिसेंबर 2017 रोजी 1 कोटी 39 लाख 39 हजार 165 रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. पुढे आरबीआयच्या इसीएलजीएस नुसार 24 लाख 90 हजार देण्यात आले.

मात्र कर्जाचे कोणतेच हप्ते न फेडल्याने कायदेशीर कारवाई करत शेख हुसेन यांचे वाकड  येथील चार फ्लॅट सील केले असता आरोपींनी बेकायदेशीरपणे फ्लॅटचे कुलूप तोडून त्यावर ताबा मिळवला. यावरून (वाकड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.