Pune : उस्मानाबादमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुण्यातील रोटरी क्लब ऑफ पुणे, गांधी भवन यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – उस्मानाबादमधील तोरंबा, उदतपुर, हिप्परगा, सालेगाव आणि हराळी या गावांमध्ये ३५ विहिरींचे खोलीकरण, २५ जनावरांचे हौद आणि २ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या. पुण्यातील (Pune) रोटरी क्लब ऑफ पुणे, गांधी भवन यांच्या प्रयत्नांतून ग्लोबल ग्रँटच्या (१९९०४९५) माध्यमातून साकारलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण उस्मानाबाद येथील तोरंबा गावातील दिलालपुर मारुतीच्या मंदिरात नुकतेच झाले.

Chinchwad : विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या रोड रोमियोवर गुन्हा

या उपक्रमासाठी मुख्य देणगीदार डॉ. दीपक भोजराज यांनी रुपये २५ लाख तर रोटरीने तब्बल ७ लाख रुपयांची मदत केली. ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राचे सहकार्य देखील यास लाभले. या उपक्रमामुळे या भागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील शेतीसाठी पाणी पुरले शिवाय गुरांना देखील वर्षभर पाणी मिळाले. यामुळे खऱ्या अर्थाने गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.

या लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्य देणगीदार डॉ. दीपक भोजराज, त्यांच्या कन्या व या उपक्रमाच्या संयोजिका अमृता देवगावकर, रोटरी क्लब ऑफ पुणे (Pune)  गांधी भवनच्या अध्यक्षा पद्मजाताई जोशी, सचिव अश्विनी शिलेदार, बाकी सदस्य, रोटरी क्लब ऑफ उमरगा येथील माजी अध्यक्ष डॉ. दीपक पोफळे, सुधीर लातूरे तसेच ज्ञान प्रबोधिनी केंद्राचे केंद्र प्रमुख अभिजित व गौरी कापरे आणि ज्ञान प्रबोधिनीचे अन्य कार्यकर्ते,  तोरंबा,  उदतपुर,  हिप्परगा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

मी दिलेल्या आर्थिक सहाय्यातून उस्मानाबाद मधील माझ्या भाऊ व भगिनींचे कष्ट काही प्रमाणात कमी झाले हे बघून आज मला अतिशय समाधान वाटते आहे, अशा भावना डॉ. दीपक भोजराज यांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.