Chinchwad : विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या रोड रोमियोवर गुन्हा

एमपीसी न्यूज – क्लास मधून सुटलेल्या आपल्या मुलाला घ्यायला जाणाऱ्या विवाहितेशी विनयभंग केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना गुरूवारी (दि.21) रात्री घडली.

Pimpri : पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या कामाला तत्वतः मंजुरी – उदय सामंत

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून उल्हास शिवाजी देठे (वय 35 रा.बिजलीनगर, चिंचवड) याच्यावर वुनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचा क्लास सुटल्यानंतर पायी जात असताना आरोपी दुचाकीवरून आला व त्याने महिलेशी गैरवर्तन करत शिट्टी विजवत पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न केली.तो नेहमी पीडितेचा पाठलाग करून त्रास देतो. त्याच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.