Chinchwad : अपहरण आणि खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – उसने दिलेले पैसे परत मागत असलेल्या व्यक्तीचे अपहरण ( Chinchwad ) करून खून करण्यात आला. तसेच मृतदेहाची ताम्हिणी घाटात विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नारायण बापूराव इंगळे (वय 46, रा. केशवनगर, चिंचवड), राजेश नारायण पवार (वय 46, रा. घरकुल, चिखली), समाधान ज्ञानोबा म्हस्के (वय 30, रा. घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रणजीत मेलासिंग (वय 70, रा. वाघोली, पुणे) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Maval : मावळ काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन

रणजीत हे पंजाब सिंध बँकेत मॅनेजर पदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी आरोपी नारायण याला 30 लाख रुपये उसने दिले होते. ते पैसे रणजीत यांनी परत मागितले. मात्र नारायण याला ते पैसे परत द्यायचे नव्हते. त्यामुळे त्याने त्याच्या दोन साथीदारांना चार लाख रुपयांची सुपारी दिली.

त्यामध्ये रणजीत यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्याचे ठरले. दरम्यान नारायण याने रणजीत यांना 19 जुलै रोजी पैसे देण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावले. रणजीत हे पैसे घेण्यासाठी नारायण याच्या घरी गेले. त्यावेळी आरोपींनी रणजीत यांचा दोरीच्या साह्याने गळा आवळला आणि चाकूने वार करत त्यांचा खून केला.

त्यानंतर रणजीत यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत आणि चादरीमध्ये मृतदेह गुंडाळून रणजीत यांच्याच कारमधून ताम्हिणी घाटात नेला. तिथे एका धबधब्याच्या पाण्यात मृतदेह फेकून दिला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना 28 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत ( Chinchwad ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.