Vadgaon : शहर भाजपच्या वतीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पोषण आहाराचे वाटप

एमपीसी न्यूज – वडगाव शहर भाजपच्या वतीने वडगाव मधील (Vadgaon) वनवासी वसतिगृह (गोपाळराव देशपांडे) केशवनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पोषण आहाराचे वाटप पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील व मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी माजी सभापती गुलाब म्हाळस्कर,वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, युवा मोर्चा सरचिटणीस अतुल म्हाळसकर वडगाव शहर भाजपा प्रसिद्धी प्रमुख अमोल ठोंबरे,संजय रौधळआदी उपस्थित (Vadgaon) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.