Wakad : बनावट औषध विक्री प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – बनावट औषधे खरी असल्याचे भासवून ती विक्रीसाठी ठेवल्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत मेडिकल दुकानदार आणि त्यांना औषधे पुरवणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई 29 जून ते 20 जुलै या कालावधीत भुमकर चौक आणि इतर ठिकाणी करण्यात आली.

Chinchwad : अपहरण आणि खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त विकास पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतीश रमेश चव्हाण (रा. वाकड), सिकंदर पुजारा (रा. अहमदाबाद), लोकेश सुकनिया खंडेलवाल (रा. जोधपुर), आदित्य कृष्ण (रा. बिहार), कामत ड्रग एजन्सी पनवेल आणि इतर अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून बनावट औषधे खरी असल्याचे भासवून मेडिकल दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवली. यामध्ये आरोपींनी रुग्णांची व शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बनावट औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.