Pune : नासाच्या सॅटॅलाइटमध्ये लागणाऱ्या द्रव्याच्या विक्रीतून मालामाल होण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ दाम्पत्याची फसवणूक

एमपीसी न्यूज – “नासा”च्या सॅटॅलाइट मध्ये ( Pune) लागणारे द्रव्य सापडले असून त्याच्या विक्रीतून भरपूर मालामाल व्हाल, असे सांगत पुण्यातील ज्येष्ठ दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली आहे. केरळमध्ये मुन्नर जिल्ह्यात वीज पडून हे द्रव्य सापडले अशी बतावणी करून घातला 2 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. हडपसर भागात राहणाऱ्या या दाम्पत्याची त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीने  फसवणूक केली आहे.

65  वर्षीय ज्येष्ठ महिलेने या संदर्भात हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून सतीश धुमाळ आणि वैशाली धुमाळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vadgaon : शहर भाजपच्या वतीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पोषण आहाराचे वाटप

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच इमारतीत राहायला आहेत. आरोपी यांनी फिर्यादी यांना केरळ मधील मुन्नर जिल्ह्यात वीज पडून एका शेतात एक द्रव्य सापडल्याचे सांगितले. तो पदार्थ सॅटॅलाइट मध्ये वापरत असल्यामुळे “नासा” विकत घेणार आहे असे सांगितले.

तुम्ही जर यामध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला 10 पटीने पैसे मिळतील असे भासवले. या गोष्टीला बळी पडून ज्येष्ठ दाम्पत्याने त्यांना 1 लाख 65 हजार रुपये दिले मात्र जवळपास वर्ष झालं तरीसुद्धा एकही रुपया परत मिळाला नाही.

ज्येष्ठ दांपत्याच्या म्हणण्यानुसार या आरोपींनी 15 जणांची अशीच फसवणूक केली आहे.

पोलीस अधिक तपास करत ( Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.