Wakad : नाकाबंदीत 27 लाखांची रोकड पकडली

एमपीसी न्यूज – वाकड – हिंजवडी पुलाखाली नाकाबंदी दरम्यान ( Wakad)  निवडणूक विभाग आणि पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने 27 लाखांची रोख रक्कम पकडली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मतदार संघात राजकीय हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यासोबतच प्रशासनाने देखील जोरदार तयारी केली आहे. यात नाकाबंदी करण्यात येत आहे.

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील सभा स.प. महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस कोर्स येथे होणार

निवडणूक विभाग आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी मुंबईकडून वाकडच्या दिशेने एक चारचाकी गाडी येत होती. पथकाने गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीत रोकड मिळून आली. गाडीतील व्यक्ती व्यावसायिक असल्याचे सांगत असून त्याला त्याच्याकडे असलेल्या रोख रकमेबाबत माहिती देता आली नसल्याने या व्यक्तीची रोकड आणि गाडी जप्त करण्यात आली आहे.

पिंपरी- चिंचवड पोलिसांनी निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला घटनास्थळी पाचारण केले. याबाबत चौकशी केली ( Wakad)  जात आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.