Chinchwad : शहरातील पर्यावरणाच्या समस्यांबाबत पर्यावरण मंत्र्यांकडे साकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वृक्षतोड, प्रदूषण, भूजल पातळी (Chinchwad) अशा विविध पर्यावरणाच्या समस्येवरून प्रशासनाकडे पाठपुरावा करत दिल्ली, मुंबई येथे आंदोलन करणारे प्रशांत राऊळ यांनी प्रभारी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. शहरातील पर्यावरण रक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी राऊळ यांनी मंत्र्यांकडे केली.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरणाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची मागणी करत शहराच्या पर्यावरणाच्या समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी राऊळ यांनी नागपूर येथे जाऊन प्रभारी पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली.

Chikhali : मद्यपी कार चालकाने दुचाकीला उडवले; दुचाकी जळून खाक

राऊळ यांनी प्रभारी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याला (Chinchwad) पर्यावरण मंत्री मिळावेत. पर्यावरण विषयक तक्रारी आणि तत्काळ मदतीसाठी आपत्कालीन मदत कक्षाची स्थापना करावी. पिंपरी-चिंचवड शहरातील वृक्ष गणनेचा तपशील दोन वर्षांपासून प्रसिद्ध केला नाही, तो प्रसिद्ध केला जावा. पिंपरी-चिंचवड शार्हतील अनियंत्रित अवैध वृक्षतोडीच्या सर्व प्रलंबित तक्रारी निकाली काढाव्यात. नदी प्रदूषणाबाबत कठोर कारवाई करावी.

पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगिक कचरा जाळण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वृक्ष संग्रहालयासाठी पिंपरी येथील डेअरी फार्मची जागा मिळावी. शहरात सिंगल युज प्लास्टिकला बंदी घालावी. नदी काठ सुधार प्रकल्प न राबवता संपूर्ण नदी सुधार प्रकल्प हाती घ्यावेत. भूजल पातळी ढासळली आहे. त्याबाबत उपाययोजना कराव्यात. रावेत मेट्रो इको पार्कची जागा बनावट पंचनामा करून ती पडीक दाखवून निवडणूक आयोगाला देण्यात आली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला ‘सार्वजनिक वाहतूक दिवस’ घोषित करावा. या दिवशी फक्त 10 रुपये एवढेच शुल्क आकारावे, असेही राऊळ यांनी निवेदनाद्वारे सुचवले (Chinchwad) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.