Chinchwad : रावण टोळीतील सराईत ‘ससा’ दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, मारामारी यांसाखे घातक गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपी ‘ससा’ला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

सागर उर्फ ससा राजकुमार वाघमोडे (वय 23, रा. स्वप्ननगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ससा मागील काही महिन्यांपासून पुन्हा गुन्हेगारी विश्वात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. जुलै 2018 मध्ये त्याने पिंपरी पोलीस ठाण्यासमोर भरदिवसा वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवली होती. त्याचबरोबर त्याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगल, दरोड्याची तयारी, दुखापत, जबर दुखापत, धमकी यांसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते.

यापूर्वी देखील त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तरीही न सुधारल्याने परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सशाला पुन्हा एकदा दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.