Hinjawadi : लग्नाचे आमीष दाखवून फसवणूक करणारा अटकेत

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमीष दाखवून महिलेवर बळजबरी केल्याप्रकरणी एकाला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे.

योगेश गणेश भानुसे (वय 33, रा. मारुंजी, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून 2017 ते 2018 असे वर्षभर तिच्यावर अत्याचार केले. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.