Wakad : ताथवडेत डंपर खाली चिरडून मजूर गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाणाऱ्या एका मजुराला डंपर ने धडक दिली. मजुराचा पाय डंपर खाली आल्याने त्यास गंभीर दुखापत झाली. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास एमटीयु कंपनीच्या गेट समोर ताथवडे येथे घडली.

Moshi : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सल्लागाराची नियुक्ती

नवीन तुक्यानायक राठोड (वय 33, रा. रहाटणी) असे जखमी मजुराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/जेपी 1919) चालक मोहित कुमार साकेत (वय 24, रा. मारूंजी, ता. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून पुनावळे येथून ताथवडे कडे जात होते. त्यावेळी डंपर चालकाने त्याच्या ताब्यातील डंपरने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. डंपरचे मागील चक फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या नडगीवरून गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.