Nigdi : रोट्रॅक्ट क्लब ऑफ मॉडर्न कॉलेजच्या अध्यक्षपदी मुकेश चौधरी

एमपीसी न्यूज – रोट्रॅक्ट क्लब ऑफ मॉडर्न कॉलेजच्या अध्यक्षपदी मुकेश चौधरी तर सचिव पदी प्रतीक्षा पटेल  यांची निवड करण्यात आली आहे. रोट्रॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ यमुनानगर निगडी येथील मॉडर्न महाविद्यालयात नुकताच पार पडला यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ मॉडर्न कॉलेजची पुढील वर्षीच्या कार्यकारिणीची यावेळी निवड करण्यात आली.

पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव शिरगावे होते. यावेळी रो बाळकृष्ण उऱ्हे, माजी अध्यक्ष रो अनिल नेवाळे, रो सुवर्णा काळे, सचिव रो महादेव शेंडकर, रो रवींद्र भावे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या माजी अध्यक्षा रो वर्षा पांगारे यांनी रोटरी इंटरनॅशनल विषयी माहिती दिली. अध्यक्ष रो सदाशिव काळे यांनी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या कामाबद्दल माहिती दिली, तसेच येत्या वर्षभरात राबविण्यात येणा-या उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्राचार्य डॉ. सदाशिव शिरगाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी अध्यक्ष अमित जाधव यांचे एक मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यामध्ये त्यांनी सर्व रोट्रॅक्टर्सना रोटरीच्या मूल्यांविषयी माहिती दिली.

तसनीम शेख यांनी सूत्रसंचालन केले. रोट्रॅक्टर मालिनी पाडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.