Pimpri : डॉ. गिरीश रांगणेकर यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – डॉ. गिरीश रांगणेकर यांनी लिहिलेल्या Media Renaissance : Bridging The Gap Between Marketing (Traditional & Digital) And Content या पुस्तकाचे पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ‘सुनिधी पब्लिशर्स’ ने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्यांनी प्रकाशित केले डॉ. गिरीश रांगणेकर यांचे हे दुसरे पुस्तक आहे.

Maharashtra News : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे

जुन्या पुणे मुंबई मार्गावरील ‘साते’ (कामशेत) येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या नूतन कॅम्पसमध्ये संपन्न झालेल्या या प्रकाशन समारंभाला डॉ. गिरीश देसाई यांच्यासह सुनिधी पब्लिशर्सचे व्यवस्थापकीय संपादक अविनाश काळे, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, कुलसचिव डॉ. डी. एन. सिंग आणि प्राध्यापक वृन्द उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. गिरीश रांगणेकर यांनी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच डॉ. गिरीश देसाई यांनी सुनिधी पब्लिशर्सचे व्यवस्थापकीय संपादक अविनाश काळे यांचे स्वागत करून माध्यम क्षेत्रामध्ये होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सदर पुस्तकाचे महत्व विशद केले. सुनिधी पब्लिशर्सच्या अविनाश काळे यांनी पुस्तक प्रकाशित करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली.

लेखक डॉ. गिरीश रांगणेकर यांनी पुस्तकांमधल्या आशयाचा तपशीलवार परामर्श घेतला. मार्केटिंग, माध्यमक्षेत्र आणि दृकश्राव्य निर्मिती या तीन वेगवेगळ्या ज्ञानशाखा आणि करिअरची क्षेत्र असल्यामुळे त्याविषयांवरची पुस्तके देखील स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. मात्र स्मार्टफोन्सच्या आजच्या जमान्यात आपण बहुतांश सगळेजण या तिन्ही गोष्टींमध्ये सहजपणे वावरतो.

आज आपण समाज माध्यमांचा वापर करताना अगदी सहज एखादी पोस्ट लिहितो, ब्लॉग लिहितो, रिल्स बनवतो आणि असा हा तयार केलेला वेगवेगळ्या फॉर्ममधला कन्टेन्ट जास्तीतजास्त लोकांनी पाहावा यासाठी मार्केटिंगचे फंडे देखील

समजून घेण्याची आपली तयारी असते. याच मानसिकतेचा आणि मागणीचा विचार करून विद्यार्थ्यांपासून ते व्यवसायिकांपर्यंत कोणालाही उपयोगी पडेल अश्या भूमिकेने हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी विशद केले. मार्केटिंग, माध्यमक्षेत्र आणि दृकश्राव्य निर्मिती यामध्ये गेली 25 वर्षे काम केले असल्याने असंख्य उदाहरणे आणि केस स्टडीज पुस्तकात वाचायला मिळतील असेही ते म्हणाले..

“Media Renaissance: Bridging The Gap Between Marketing (Traditional & Digital) And Content” हे पुस्तक लवकरच अमॅझॉनवर उपलब्ध होणार असून अधिक माहितीसाठी  94230 91118 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकाशकांकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.