Maval : पिराच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या पर्यटकाला बिबट्याने पळवल्याची अफवा

एमपीसी न्यूज – मावळ (Maval) तालुक्यातील आंबी येथे पिराच्या डोंगरावर फिरायला गेलेली एक व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या अफवेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना रविवारी (दि. 10) सायंकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी परिसरातील आंबी गावाजवळ मंगरूळ डोंगर (पिराचा डोंगर) आहे. त्या डोंगरावर रविवारी दोन मित्र फिरण्यासाठी गेले होते. त्यातील एकजण बेपत्ता झाला. त्यानंतर त्यास बिबट्याने पळवले असल्याची शंका व्यक्त केली जात होती. मात्र या घटनेची पोलिसांनी पुष्टी केली नाही. मात्र, काही वेळात ते दोघे घरी परतल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
 घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांसह बचाव पथकांचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.  परंतु दारूच्या नशेत काही लोकानी ही अफवा पसरवल्याचे उघडकीस आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.