Maval LokSabha Election : ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली असून या मतदानाचे(Maval LokSabha Election) वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला  यांनी जाहीर केले आहे.

मावळ तसेच चिंचवड  विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया 8 व 9 मे रोजी तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) 5 मे व 7 ते 9 मे दरम्यान नोंदवून घेण्यात येणार आहे.

Rayreshwar Police Centre : अवघ्या 160 मतदारांसाठी मतदान पथकांची तारेवरची कसरत;रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

पिंपरी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया 7 व 8 मे रोजी तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर 7 ते 9 मे दरम्यान नोंदवून घेण्यात येणार आहे, असेही मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात(Maval LokSabha Election) आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.