Pimpri : गुढी पाडव्यानिमित्त प्राण्यांसाठी पाण्याचे पात्र ठेवून सण साजरा

एमपीसी न्यूज – दि येंजेल एंटर प्राईजेस व W.F.V संस्थे तर्फे पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे प्राण्यांसाठी पाणी ठेवून पर्यावरणपुरक सण साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडईमध्ये दुकानासमोर मोकळ्या जागेत गुढी पाडव्या निमित्त सुमधुर संगीत सत्संग आयोजित केला गेला सुमारे 100 शंभर पेक्षा जास्त लहान, तरुण आणि वयस्कर सर्व भाविकांनी ही सत्संग मध्ये नृत्य करत सहभाग घेतला.

PSI Physical Test : पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेची शारीरिक चाचणी लांबणीवर

आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक व गायक अंबर पोकळे, सहगायक संजना चिक्से, नारायणी म्हेत्रे व तबला वादक तानाजी टिंगले ह्यांच्या गायन व वादक यांच्या वादन व गायनाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग संत तुकाराम नगर चे प्रशिक्षक सचिन नाईक व स्वयंसेवक रवी सकाटे, अमेय जोशी, (कृणाल ओसवाल -WFV ट्रस्ट), पूजा सक्सेना, राजीव सक्सेना, नंदिनी सिंग, प्रतिमा नाईक, गुरुनाथ सुतार, (छोटा सेवक कुश नाईक), साहिल दिंग्रा, कुसुम तिवारी, शंकर सोनार, गणेश धाळपे, योगिता धाळपे, अनिकेत जाधव ह्यांनी केले. येथील गुरू टेलर चे ही उत्तम सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.