Pune : उन्हाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर

यंदा ९७ टक्के पावसाचा अंदाज
एमपीसी न्यूज- उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून आज, सोमवारी पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमान 39.2 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. दुपारपर्यंत कडक ऊन आणि दुपारनंतर ढगाळलेले वातावरण अशी एकूण हवामानाची परिस्थिती आहे.

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने घरातही उकाडा असह्य होऊ लागला आहे. कूलर, एसी, फॅनचा वापर करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. कडक उन्हामुळे पुणेकर हैराण झाले असून घराबाहेर पडताना उन्हापासून वाचण्यासाठी टोपी, गॉगलचा वापर करू लागले आहेत.
दरम्यान, यंदा देशात 97 टक्के पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवल्याने बळीराजा सुखावणार आहे. हवामान विभागाने आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन यंदाचे पाऊसमान कसे राहील याबाबतची माहिती दिली.

गेल्या वर्षी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.