Telangana : तेलंगणात कॉंग्रेसचा ‘अभय हस्तम’ जाहीरनामा;  6 मोठी आश्वासने

एमपीसी न्यूज – तेलंगणातील विधानसभेच्या 119 जागांसाठी 30 नोव्हेंबर रोजी (Telangana)निवडणूक होणार असून त्यापूर्वी काँग्रेसने आपला जाहीरनामा ‘अभय हस्तम’ प्रसिद्ध केला आहे. कॉंग्रेस पक्षाने तेलंगणासाठी 42 पानांचा जाहीरनामा जारी केला आहे. ज्यामध्ये 6 हमीसह अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

 

तेलंगणासाठी काँग्रेसची 6 आश्वासन

PCMC : शहराचा विकास पाहून नेपाळचे शिष्टमंडळ भारावले

1. महिलांना दरमहा 2,500 रुपये देणार

2. गॅस सिलिंडर 500 रुपयांना उपलब्ध करून देणार

3. सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज

4. 10 लाखांच्या आरोग्य विम्याचे आश्वासन

5.’चेयुता’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 4,000 रुपये सामाजिक पेन्शन मिळेल.

6.’रैतू भरोसा’ अंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी  15,000 रुपये गुंतवणूक सहाय्य  आणि  शेतात काम करणाऱ्या मजुरांना 12,000 रुपये दिले जातील.

 

या यासह अनेक सवलती देण्याचे आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यात दिले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.