Pimpri : एरियात भाजीची गाडी लावायची नाही म्हणून दोन भावांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – एरियामध्ये भाजीची गाडी लावायची नाही म्हणून दोन भावांना आठ ते नऊ जणांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी वल्लभनगर (Pimpri) परिसरात घडली.

Ravet : वेलफेअर टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

याप्रकरणी पोलिसांनी समीर मुस्तफा पठाण वय 30 नूर मोहम्मद बादशाह शेख इमरान चांद शेख मोईन मुक्तार पठाण नजीर बादशाह शेख व सईद मुस्तफा पठाण यांना अटक केली आहे तर अमजद पठाण शकील मतेखान सोहेल मतेखान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अनिल कैलास गिरी (वय 29 रा.पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व फिर्यादीच्या भावाने भाजीची गाडी लावली असता या एरियामध्ये भाजीची गाडी लावायची नाही म्हणून आरोपीने फिर्यादी व त्यांचा भाऊ प्रमोद ठार मारण्याचे धमकी दिली. तसेच लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी हातातील दांडके हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली.

यामुळे परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद करत पळून गेले होते. यावरून पिंपरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.