Ravet : वेलफेअर टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – वेलफेअर टास्क पूर्ण केल्यास जास्तीचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून महिलेकडून तीन लाख 65 हजार रुपये घेत तिची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 23 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत रावेत (Ravet) येथे घडला.

Pimpri : भाजी विक्रेत्याला टोळक्याकडून मारहाण, चार जणांना अटक

याप्रकरणी महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9599605181 मोबाईल क्रमांक धारक अनोळखी व्यक्ती, संध्या देवी, बना पारेख (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना पार्ट टाईम जॉब असल्याचे सांगून यु ट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून ग्रुप वेलफेअर टास्क पूर्ण केल्यास जास्तीचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून टास्क पूर्ण करण्यासाठी महिलेकडून एका बँक खात्यावर तीन लाख 65 हजार रुपये घेतले. त्यानंतर महिलेला कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.