Pimpri : भाजी विक्रेत्याला टोळक्याकडून मारहाण, चार जणांना अटक

एमपीसी न्यूज – एका भाजी विक्रेत्याला चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे ही घटना मंगळवारी (दि.12) दुपारी पिंपरीतील (Pimpri) उद्यमनगर परिसरात घडली.

Bhosari : झाडावर जाहिरात लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

पिंपरी पोलिसांनी सिकंदर उर्फ प्रमोद गिरी (वय 45) सुनील गिरी (वय 26) सागर शहा (वय 36) अमित गिरी (वय 23) सर्व राहणार पिंपरी यांना अटक केली असून अनिल गिरी (वय 29) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सईद मुस्तफा पठाण (वय 23 रा.पिंपरी ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो लावून भाजी विक्री करत होते. आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी भाजीपाल्याचा टेम्पो येथे लावला या रागातून फिर्यादीला पकडून शिवीगाळ करत लाकडी बांबूने मारहाण केली. तसेच वजनाचे लोखंडे माप मारून फिर्यादी यांना जखमी केले यावरून पिंपरी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.