Bhosari : झाडावर जाहिरात लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – झाडावर खिळे ठोकून (Bhosari ) जाहिरात लावणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर दहामधील श्रीराम कॉलनी, आशीर्वाद कॉलनी मध्ये झाडांवर जाहिरातींचे फलक लावल्याचा प्रकार 5 सप्टेंबर रोजी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या निदर्शनास आला. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्यान व वृक्ष संवर्धन विभागातील उद्यान सहायक सुहास सामसे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर दहा मधील श्रीराम कॉलनी आणि आशीर्वाद कॉलनी मध्ये रेन ट्री प्रकारच्या झाडावर साईनाथ टेक्निकल इंस्टीट्युट नावाचा जाहिरातीचा फलक खिळे मारून लावण्यात आला आहे. तसेच निलगिरीच्या झाडावर योद्धा अकॅडमी नावाचा जाहिरात बोर्ड लावण्यात आला आहे.

Chinchwad : मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा शनिवारपासून

हा प्रकार उद्यान विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी महाराष्ट्र (Bhosari) मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.