Wakad: आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे भूमिपूजन

 आमदार लक्ष्मण जगताप यांचा पाठपुरावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी जशी ओळख आहेत. तसेच शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संकुले देखील आहेत. मोठ्या प्रमाणात शिक्षणाची सोय असताना सुध्दा शहरात वसतिगृह  नव्हते. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठपुराव करुन अनुसुचित मुला-मुलींकरीता नवीन वसतिगृह मंजूर करुन घेतले. या कामाचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज (शनिवारी) भूमिपूजन करण्यात आले. 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या  वाकड पेठ क्र.40   येथे अनुसुचित जाती जमातीच्या मुला-मुलींकरीता वसतिगृहाचे बांधकाम केले जाणार आहे. पिंपरी- चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. अनुसुचित जातीं जमातीच्या  मुला-मुलींकरीता या शहरात एकही शासकीय वसतिगृह नसल्यामूळे शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते. याची दखल घेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेऊन शहरात  आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींकरीता वसतीगृह मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले.

त्याबाबताचा प्रस्ताव पाठविणे, तो प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आमदार जगताप यांनी  आदिवासी विकास विभागाकडे  पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण  येथे वाकड, पेठ क्र.40 येथे वसतिगृह बांधण्यास सरकारने परवनागी दिली आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.