India News : भारताच्या 105 पुरातन वस्तू अमेरिकेतून मायदेशी परतल्या

एमपीसी न्यूज – अमेरिकेत असलेल्या भारताच्या 105 पुरातन वस्तू भारतात आणल्या गेल्या आहेत. भारताच्या पुरातन कलात्मक वस्तू परत केल्याबद्दल पंतप्रधानांनी अमेरिकेचे आभार मानले.

Nigdi : गझलपुष्प संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार म. भा. चव्हाण यांना जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे यासंदर्भात आभार मानले आहेत. या 105 पुरातन वस्तू भारतातील प्रदेश आणि परंपरांचे वैविध्‍य दर्शविणा-या आहेत. 12 व्या शतकापासून ते 18 व्या शतकापर्यंतच्या मौल्यवान वस्तूंचा यात समावेश आहे. वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाने याबाबत ट्विट केले आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले, “यामुळे प्रत्येक भारतीयाला आनंद होईल. याबद्दल अमेरिकेचे खूप आभार. या मौल्यवान कलाकृतींना सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे. या वस्‍तू भारताला परत मिळण्‍याची घटना, आमचा वारसा आणि समृद्ध इतिहास जतन करण्याच्या आमच्या वचनबद्धतेच्या बांधिलकीशी निगडित आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.