Nigdi : गझलपुष्प संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार म. भा. चव्हाण यांना जाहीर

एमपीसी न्यूज – ‘गझलपुष्प’ या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘स्व. सुदामदादा कराळे जीवन गौरव’ पुरस्कार मराठी साहित्यातील गझल या प्रकारात लेखन, सादरीकरण व प्रचार करणारेे ज्येष्ठ गझल लेखक म.भा. चव्हाण यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 22) निगडी (Nigdi) प्राधिकरणातील कॅप्टन जी एस कदम सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता संपन्न होणार आहे.

Pune : कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी होणार साजरा

मराठी गझल ऐकणारे अनेक श्रोते पिंपरी चिंचवड परिसरात राहतात. अशा सर्व श्रोत्यांना गझल ऐकण्याची संधी मिळाली आहे. गझलपुष्प संस्थेतर्फे ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांना जीवनगौरव देऊन सन्मानीत केले जाणार आहे. या गौरवानंतर बहारदार मराठी गझल मैफिल देखील आयोजित करण्यात आली आहे. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

 

म. भा. चव्हाण हे गझल विश्वातील मोठे व्यक्तिमत्त्व आहे. ते १९७२ पासून कविता, तसेच १९८२ पासून गझल लिहीत आहेत. त्यांना गझल विश्वातील मोठे नाव असलेल्या सुरेश भट यांचा निकटचा सहवास देखील लाभला आहे. विविध नियतकालिके, वृत्तपत्र, दिवाळी अंक, काव्यसंग्रह आणि गझलसंग्रह यामाध्यमातून सातत्याने त्यांचे गझललेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांची ‘असेलही नसेलही’ ही गझल प्रसिद्ध असून ती सातत्याने विविध कार्यक्रमांत सादर केली जाते.

 

हा पुरस्कार गझलपुष्प संस्थेच्या मासिक सभेमध्ये सर्व सभासदांच्या एकमताने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यावेळी गझलपुष्पचे संस्थापक अध्यक्ष दिनेश भोसले, विद्यमान अध्यक्ष संदीप जाधव, कार्याध्यक्ष प्रशांत पोरे, कोषाध्यक्ष अभिजित काळे, ज्येष्ठ सल्लागार नंदकुमार मुरडे, सुहास घुमरे, सरोज चौधरी, नीलेश शेंबेकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

यापुढे दरवर्षी १५ एप्रिल  रोजी गझलसम्राट सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे संस्थेच्या कार्यकारिणी सभेमध्ये ठरविण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.