Pimpri : राष्ट्रीय लोकन्यायालयात 1128 प्रकरणे निकाली; 4.95 कोटीचा महसूल जमा

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 9) राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 1128 प्रकरणे निकाली निघाली असून 4.95 कोटीचा महसूल जमा झाला आहे.
लोक न्यायालयात पिंपरी न्यायालायात विविध प्रकारचे 204 खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये 2 कोटी 70 लाख 44 हजार 149 रुपये महसूल जमा झाला व आकुर्डी येथील न्यायालयात येथे 924 खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये 2 कोटी 25 लाख 46 हजार 460 रुपये महसूल जमा झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेश पुणेकर त्यांनी भूषवले. सदर कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे यांनी केले त्यावेळी महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सदस्य ॲड. स्वप्नील वाळुंज, ॲड. सौरभ जगताप, ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. अक्षय केदार उपस्थित होते. ॲड. शोभा कड यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. वानखेडे, आर. एम. गिरी यांचा सत्कार पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
लोकन्यायालय करिता पॅनल ॲडव्होकेट म्हणून काम ॲड. निलम जाधव व ॲड. अक्षय भालेराव तसेच आकुर्डी येथील न्यायालयात ॲड. सुषमा पाटील यांनी पाहिले. राष्ट्रीय लोक अदालत निमित्त बार असोसिएशन तर्फे बालाजी विधी महाविद्यालयाचे सानिका शेवाळे, देवयानी नाईक, सरिता वैद्या, श्रावणी शिंदे, वैष्णवी पाटील, नेहा अहिरवल, पायल बोधक, समर्थ शेळके, सिद्धार्थ लोखंडे, दिक्षा नांद्रे, चाणक्य वाडे, निखिल गिरी यांनी स्किट प्लेच्या माध्यमातून मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व व जागृती पक्षकारांसमोर सादर केली.
याप्रसंगी बालाजी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधूश्री जोशी या देखील उपस्थित होत्या. पथनाट्यचे संयोजन ॲड. मंगेश खराबे यांनी केले. तसेच यावेळी एस एन बी पी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. न्यायधीश वानखेडे यांनी मार्गदर्शन करतांना नागरीकांना लोकअदालत व त्याचे महत्व सांगितले. जास्तित जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, ॲड. सतीश गोरडे, ॲड. सुनील कडूस्कर, सर्व सरकारी वकील तसेच पिंपरी बारचे बहुसंख्य वकील बंधू भगिनी, पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनच्या महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे यांनी केले. तर ॲड. प्रशांत बचुटे यांनी आभार मानले.

https://youtu.be/mnwLzzXmWGM?si=WfVdywJnt1i-mCK3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.