Alandi : गणेशोत्सव निमित्त आळंदीतील गणेश मंडळांची लगबग सुरू

एमपीसी न्यूज – बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती असलेल्या गणपती सुख चैतन्य आणि समृद्धी घेऊन येत असतो. या श्री गणरायाचे 19 सप्टेंबर रोजी सर्वत्र आगमन होत आहे.

Pune Airport : ३० विमाने वाढणार, तर प्रवासी १० हजारांनी वाढणार

त्यानिमित्त आळंदी (Alandi) शहरातील नगरपालिका चौक, दत्त नगर,घुंडरे आळी,तुळजा भवानी चौक,वडगांव चौक,चाकण चौक,केळगांव रोड ,मरकळ रोड इ.अशा विविध ठिकाणी तेथील गणेश मंडळांची गणराया करिता मंडप उभारणीची जोरदार तयारी चालू आहे. तर काही ठिकाणी गणेशोत्सव निमित्त देखाव्याच्या कामाची लगबग सुरू आहे.

यावर्षी आळंदी शहरातील कोण कोणती मंडळे आकर्षक देखावे करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गणेश मंडळांचे यावर्षी गणेश उत्सवा निमित्त आळंदी नगरपरिषदे कडून प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक काढून त्या गणेश मंडळांना पालिकेच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.