Alandi: माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीद्वारे साकारले विघ्नहराचे रूप

एमपीसी न्यूज :  आज (दि .9)चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा मराठी नूतन वर्षानिमित्त संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर (Alandi) अष्टविनायकांपैकी  एक असलेल्या ओझर येथील श्री.विघ्नहर गणेशाचे रूप चंदन उटीतून समाधीवर साकारण्यात आले.

Chinchwad Traffic Diversion : रमजान ईद निमित्त चिंचवड मधील वाहतुकीत बदल

आज गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण म्हणून सगळीकडे साजरा करण्यात येतो. आजच्या ह्या शुभमुहूर्तावर  ओझर येथील श्री.विघ्नहर गणेशाचे रूप चंदनउटीतून समाधीवर (Alandi) साकारण्यात आले. या चंदनउटीतून समाधीवर साकारण्यात आलेल्या विघ्नहराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.ही चंदन उटी अभिजित धोंडफळे, उमा धोंडफळे, दीप्ती धोंडफळे,मोरेश्वर जोशी,योगेश चौधरी,सौरभ चौधरी ,ज्येष्ठराज जोशी यांनी  देवस्थानच्या सहकार्याने  साकारली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.