Pune Airport : ३० विमाने वाढणार, तर प्रवासी १० हजारांनी वाढणार

एमपीसी न्यूज  – पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीला विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. सुविधांची चाचणीदेखील यशस्वी ठरली आहे. कामावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. विमानतळ प्रशासनाने विमानसेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन येत्या आठ ते दहा दिवसांत कार्यालयांचे स्थलांतर नव्या टर्मिनलमध्ये करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नवे टर्मिनल वापरात येण्याची शक्यता वाढली आहे.

Pimpri : पिंपरी न्यायालयात लोकअदालतमध्ये पथनाट्याचे सादरीकरण

सध्याच्या टर्मिनलच्या इमारतीची जागा कमी असल्याने विमानांच्या वाहतुकीवर मर्यादा येत होत्या. शिवाय प्रवासी सुविधांना देखील फटका बसत होता. गर्दीच्या हंगामात प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याचा ताण प्रवासी सुविधेवर पडतो. तसेच सुरक्षा तपासणीपासून (सेक्युरिटी चेक इन) ते बॅगेज बेल्टपर्यंत सर्वच ठिकाणी प्रवाशांच्या रांगा ठरलेल्या होत्या. त्यामुळे विमानतळाचा विस्तार होणे आवश्यक होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.