Pimpri : पिंपरी न्यायालयात लोकअदालतमध्ये पथनाट्याचे सादरीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘वाद- निवारणाची गुरुकिल्ली’, ‘मध्यस्थ म्हणजे काय’ या विषयावर पटनाट्य सादर केले. कार्यक्रमाची सुरवात लोकन्यायालयाच्या उद्घाटनाने झाली.

Pune : कनेक्टिंग ट्रस्टचा पुढाकारातून वर्षभरात 17 हजार 832 व्यक्ती आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेश पुणेकर होते. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ उपाध्यक्षा ॲड जयश्री कुटे, सचिव ॲड गणेश शिंदे, महिला सचिव ॲड प्रमिला गाडे, ऑडिटर ॲड राजेश रणपिसे, सदस्य ॲड स्वप्नील वाळुंज, ॲड सौरभ जगताप, ॲड प्रशांत बचुटे यांनी केले. ॲड शोभा कड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. वानखेडे, आर. एम. गिरी यांचा सत्कार पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.

या पथनाट्यात सानिका शेवाळे, दिव्यानी नाईक, सरीता वैद्य, श्रावणी शिंदे, दिक्षा नांद्रे, वैष्णवी पाटिल, नेहा अहेवाल, पायल बोदक, समर्थ शेळके, सिद्धार्थ लोखंडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बालाजी विधी महाविद्यालयच्या मुख्याध्यापिका डॉ. मधुश्री जोशी, तेजस्वी आव्हड, श्रीमती आकांक्षा, चाणक्य वड्डे, निखिल गिरी, ॲड. मंगेश खराबे यांनी यासाठी संयोजन केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पथनाट्यांद्वारे सामाजिक, कायदेविषयक जनजागृती केली. या पथनाट्यातून मध्यस्थाची महत्वाची भूमिका जनते समोर आली व त्याचे फायदे व त्याची कार्य पद्धती पटवून देण्यात आली. पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देउन सन्मानित करण्यात आले.

पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे म्हणाल्या, “दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 89च्या तरतुदीनुसार प्रलंबित खटल्यांची संख्या कमी व्हावी व न्याय मिळणे सुकर व्हावे हयाकरीता उच्च न्यायालयातर्फे मुंबई व सर्व जिल्हा न्यायालयामध्ये मध्यस्थी केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.”

ॲड. मंगेश खराबे म्हणाले, “समाजात आजही मोठ्या प्रमाणावर कायद्याविषयी अनभिज्ञता असून राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच विधी महाविद्यालये कायद्यांविषयीची जनजागृती करण्याचे मोलाचे काम करतात.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.