Pimpri : पिंपरी न्यायालयात 120 वकिलांची नेत्र तपासणी

एमपीसी न्यूज – पिंपरी न्यायालयात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार (Pimpri) असोसिएशन व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 4) नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये 120 वकील बांधवांची नेत्र तपासणी करण्यात आली.

Chinchwad : सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी रेल्वे पोलिसांची विशेष जनजागृती मोहीम

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, सदस्य ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. नितीन पवार, ॲड. बाजीराव दळवी, माजी अध्यक्ष ॲड. छाजेड, ॲड. सुनील कडुसकर, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतिक जगताप, ॲड. गौरव वाळूंज,  ॲड. रामराजे भोसले,

ॲड. सुनील दातीर, ॲड. लाळगे पाटिल, ॲड. गोरख कुंभार, ॲड. संतोष मोरे, ॲड. श्रीमती रायते, ॲड. स्नेहा कांबळे, ॲड. गीतावली जाधव, ॲड. सविता तोडकर, ॲड. जयश्री कोंद्रे, ॲड. ऐश्वर्या शिरसाठ, ॲड. निलम जाधव आदी उपस्थित होते.

नेहरूनगर, पिंपरी येथील न्यायालयातील बार रूममध्ये हे शिबीर पार पडले. न्यायाधीश, वकील व न्यायालयीन कर्मचारी अशा एकूण 120 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.

नेत्र तपासणी करणाऱ्या डॉक्टर व तांत्रिक विभागातील सहकाऱ्यांचा बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे (Pimpri)  यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.