Chinchwad : सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी रेल्वे पोलिसांची विशेष जनजागृती मोहीम

एमपीसी न्यूज – रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी स्वतःची काळजी घेत रेल्वेच्या (Chinchwad) नियमांचे पालन करावे. रेल्वे प्रवासात कोणतीही अडचण आल्यास 139 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, अशा प्रकारची जनजागृती रेल्वे पोलिसांकडून केली जात आहे. चिंचवड रेल्वे पोलिसांकडून हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रत्येक रेल्वेगाडीतील प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबाबत सूचना दिल्या जात आहेत.

PCMC : सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सन्मान

चिंचवड रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ जाधव (तळेगाव), सहायक पोलीस उपनिरीक्षक पूनम शर्मा, महिला हेड कॉन्स्टेबल आरती कदम हे पोलीस पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, बेगडेवाडी, घोरावाडी, तळेगाव रेल्वे स्थानकांवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधत आहेत.

रेल्वेने 139 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. रेल्वे प्रवासात कोणतीही अडचण आल्यास प्रवाशांनी या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक पोलीस उपनिरीक्षक पूनम शर्मा यांनी चिंचवड येथे प्रवाशांना केले.

प्रवाशांनी 139 या क्रमांकावर फोन केल्यास प्रवासी कोणत्या रेल्वेत आहे त्याबाबतची माहिती नियंत्रण कक्षातून संबंधित रेल्वे स्थानकावर कळवली जाते. त्यानंतर तत्काळ रेल्वे स्थानकावर यंत्रणा सतर्क करून संबंधित प्रवाशांना मदत केली जाते.

ऑक्टोबर महिन्यात रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम हाती घेतली (Chinchwad) आहे. रेल्वेत मद्यपान, धुम्रपान करू नये, रेल्वेवर दगड फेकू नये, दरवाजात उभा राहून प्रवास करू नये, रेल्वे रूळ ओलांडू नये त्यासाठी स्थानकावरील उड्डाणपुलाचा वापर करावा, अशा सूचना रेल्वे पोलिसांकडून प्रत्येक रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशांना दिल्या जात आहेत. तसेच अशा प्रकारचे नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांना होणाऱ्या दंडाची देखील माहिती दिली जाते.

लहान मुले व महिलांच्या सुरक्षेसाठी देखील रेल्वे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मानवी तस्करी होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांनी सर्व रेल्वे गाड्या व स्थानकांवर करडी नजर ठेवली आहे.

प्रवाशांनी अनोळखी व्यक्तीने दिलेले अन्नपदार्थ खाऊ नये, बेवारस सामान दिसल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असेही या मोहिमेत सांगितले जात (Chinchwad) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.