PCMC : सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी प्रशासन, वैद्यकीय, स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य यासारख्या ( PCMC ) विविध विभागात 25 ते 30 वर्षे प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळेच आपले शहर उत्तमरित्या विकसित आणि आदर्श शहर निर्माण होण्यास मदत झाल्याचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी म्हटले.    

PCMC : नगरसचिव विभागाच्या कर्मचा-यांनी घेतले जीआयएस प्रणालीचे धडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माहे सप्टेंबर 2023 अखेर सेवानिवृत्त होणा-या 21 कर्मचा-यांचा ( PCMC ) सत्कार अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.  

सह शहर अभियंता रामदास तांबे, मनोज सेठीया, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या चारुशिला जोशी, नथा मातेरे, शिवाजी येळवंडे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे सप्टेंबर 2023 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, असिस्टंट मेट्रन स्नेहल करमरकर, कार्यालय अधिक्षक नंदकुमार यनपुरे, उपलेखापाल शालन टिळेकर, राजेंद्र चौगुले, मुख्य लिपिक संभाजी पार्टे, आरोग्य निरीक्षक संदिप कोतवडेवर, सुरक्षा निरीक्षक अनिल तिकोणे, उपशिक्षक वंदना जांभळे, संगिता पवार, वायरलेस ऑपरेटर बबन पानमंद,

वाहनचालक दिगंबर टिके, रखवालदार मच्छिंद्र बालवडकर, मुकादम भगवान वाजे, मुकुंद कदम, शिपाई मोरेश्वर भदे, मजूर प्रदिप ढोरे, दस्तगिर तांबोळी, दिलीप अजनकट्टी, सफाई सेवक मिराबाई बोथ, अशोक जाधव यांचा समावेश ( PCMC ) आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप ( PCMC ) यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.