PCMC : नगरसचिव विभागाच्या कर्मचा-यांनी घेतले जीआयएस प्रणालीचे धडे

एमपीसी न्यूज – पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी (PCMC) पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जीआयएस सक्षम इआरपी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पालिकेच्या नगरसचिव विभागाला बहुतांश प्रक्रिया स्वयंचलित करण्यात मदत होण्यासाठी म्युनिसिपल सेक्रेटरी मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे नगरसचिव विभागाच्या मुख्य लिपिक, लिपीक, कॉम्पुटर ऑपरेटर आदी कर्मचा-यांना जीआयएस संगणक प्रणालीचे धडे देण्यात आले.

विषय पत्र निर्मिती आणि त्याची मंजुरी, अजेंडा अहवाल, मीटिंग कॅलेंडर, अहवाल वितरण, बैठकीचे वृत्तांत, अहवाल तयार करणे, प्रकाशन करणे, नगरसदस्यांचे मानधन, डॅशबोर्डबाबत 130 हून अधिक लिपिक, वरिष्ठ लिपिक, संगणक परिचालक आदींनी प्रणालीची माहिती घेतली.

Pune : छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी नगरसेविकेवर वारंवार बलात्कार आणि उकळले 10 लाख रुपये!

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार आदी (PCMC)उपस्थित होते.

जीआयएस प्रकल्पांतर्गंत महापालिकेच्या विविध विभागांच्या स्वयंचलित (PCMC) कार्यप्रणालीसाठी 33 आयटी सॉफ्टवेअर्स एकात्मिक पद्धतीने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये, नागरिकांचा सहभाग व पारदर्शक प्रशासन, जी.आय.एस. प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, संसाधनांचे सुधारित नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.

नागरिकांना भविष्यातील होणारे फायदे लक्षात घेवून जीआयएस प्रणाली राबविण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे महापालिका नगरसचिव विभागाद्वारे सुरू असलेली कार्यप्रणाली यामध्ये, डॉकेट तयार करणे, अजेंडा तयार करणे, नगरसेवकांचे मानधन, स्थायी समितीची बैठकीची कार्यवाही, सर्वसाधारण सभा डिजीटल करणे इ. प्रक्रिया स्वयंचलित पध्दतीने राबविण्यास मदत  (PCMC) होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.