Alandi : बँक मॅनेजर असल्याचे सांगून तरुणाची कर्ज देण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज –  कर्ज देण्याच्या बहाण्याने  एका तरुणाची  तब्बल  एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना चऱ्होली (Alandi) येथे घडली.

Chakan: विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची ट्रकला धडक, ट्रकचालकालाच केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ( जालिंदर माणिक गावडे (वय 33 रा.चऱ्होली) यांना  एका अनोळखी व्यक्तीने मी बजाज फायनान्स कंपनीमध्ये व्यवस्थापक                        म्हणून काम करत आहे आणि सध्या  बजाज  फायनान्स कंपनीकडून आकर्षक ऑफर्स चालू असून तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोरवर आधारित त्वरीत कर्ज  मंजूर करून तुमच्या बचत खात्यामध्ये  पैसे जमा करून देतो  असे  फिर्यादीच्या मोबाईल वर कॉल करून सांगितले. तसेच, या कर्जासाठी  प्रोसेसिंग फी  फक्त  10 हजार रुपये आणि  सिक्युरिटी म्हणून 1 लाख रुपये   घेत ती रक्क्म स्वतःच्या खात्यात घेत जमा करून घेत फिर्यादीची (Alandi) फसवणूक केली.

तसेच, फिर्यादीला  8830150465  ह्या मोबाईल क्रमांकावरून  कॉल  येऊन फसवणूक झाली आहे असे समजते. या प्रकरणी जालिंदर माणिक गावडे (वय 33 रा.चऱ्होली) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आळंदी पोलिसांनी  8830150465 मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.