Pune: शिवसेनेने स्व. वसंतदादां विषयीचे ऋणानुबंध लक्षात घेता, ‘सांगली’ ची जागा मोठ्या मनाने काँग्रेस’ला सोडावी – गोपाळ तिवारी 

एमपीसी न्यूज – मुंबईत शिवसेनेच्या स्थापनेचे वेळी महाराष्ट्रात स्व. वसंतदादा पाटील (Pune)यांचे नेतृत्वाखालील सरकार होते. मुंबईत प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढे आला होता. त्या वेळी ‘केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या काँग्रेस श्रेष्ठींना, योग्य पध्दतीने वास्तवता समजाऊन, महाराष्ट्राची अस्मिता जपत, शिवसेने सारख्या प्रादेशीक पक्षाची पाया भरणी झाली होती. 
तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी केलेले अभितपुर्व सहकार्य मौलीक(Pune) होते व या बाबतचे पुरक वक्तव्य स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील केले होते. काही काळ स्व. वसंतदादा बाजू घेत असल्यामुळे सेनेस काही काळ वसंत सेना देखील संबोधले गेल्याचे ही ऐकिवात येते.
मात्र, आज त्याच स्व. वसंतदादा पाटील यांच्या सांगली च्या मतदार संघा साठी काँग्रेसला वारंवार मनधरणी वा याचना करावी लागू नये हीच राज्यातील समस्त काँग्रेसजनांची भावना आहे, असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे.

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी – अजित गव्हाणे

यापुढेही जाऊन, सांगलीचे शिवसेनेचे ऊमेदवार चंद्रहार पाटील यांनी देखील ‘काँग्रेसचे संभाव्य ऊमेदवार विशाल पाटील व सांगली’साठी सकारात्मक सहकार्य करण्याची तयारी व मानसिकता ही दर्शवली होती, हे देखील विसरतां कामा नये.

श्रीमती सोनियाजींनी प्रसंगी राज्याच्या हितासाठी, प्रसंगी तत्वांना आवर घालुन, किमान समान कार्यक्रमावर आपल्या नेतृत्वा खालील मविआ सरकारला पाठींबा ही दिला. याचे ही आधाडी धर्माचे पालन करीत सेना नेत्यांनी स्मरण ठेवावे व मोठ्या मनाने, प्रगल्भता दाखवून स्व.  वसंतदादा पाटीलांचा ऐतिहासीक वारसा असलेल्या सांगली’ची जागा काँग्रेस’ला सोडावी, असे विनम्र आवाहन केले.
तसेच माजी मंत्री व सांगलीचे युवा नेते डॅा विश्वजीत कदम यांनी प्रकट केलेल्या “सांगलीकर – काँग्रेसजनांच्या” भावनांचाही आदर करावा, असेही आवाहन केले. आज जर स्व  पतंगरावजी कदम असते तर ही वेळ आली असती काय(?) अशी पुस्ती ही  गोपाळ तिवारी यांनी जोडली.
तसेच सातारा लोकसभेचे खासदार श्री निवासजी पाटील जर निवडणुक लढवत नसतील, तर सातारा जिल्ह्यातील समस्त काँग्रेसजनांचा आग्रह पाहून ती जागा पवार शरदरावजी साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस करीता सोडावी, असेही विनम्र व विनंती वजा आवाहन  गोपाळ तिवारी यांनी केले आहे.
इंडीया आधाडीच्या जेष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी व्यापक देशहित, राज्याचे हित, संविधान व लोकशाही करीता ‘ऐक्य भावनेला’ सर्वोपरी प्राधान्य देण्याची गरज आहे.
तसेच, शरदरावजी पवार साहेब यांनी “स्व. राजीव गांधी सोबतचे ऋणानुबंध लक्षात घेऊन, स्व. राजीव गांधींनीच राजकारणात पाचारण केलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचे साठी सातारा काँग्रेसला देणे बाबत  विचार करावा” व इंडीया आघाडीतील कार्यकर्त्यांचे आपल्या विषयीचा आदरभाव आणखीन द्वीगुणीत करावा, अशी प्रेमाची व आग्रही विनंती करणारे आवाहन समस्त महाराष्ट्रातील काँग्रेसजनांतर्फे गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.