सिंबायोसिसमध्ये शिकणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज- पुण्यातील विमाननगर येथील सिंबियोसिस महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका नेपाळी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली.

राहुल अनिल आगरवाल (वय 21. स. रा. कोणार्क नगर, विमाननगर) असे या विद्यार्थयाचे नाव आहे. तो एका रो हाउसमध्ये मित्रांसोबत राहत होता. रात्री नऊच्या सुमारास राहुल घराचा दरवाजा उघडत नव्हता. दरवाजा तोडल्यानंतर राहुल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. अधिक तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.