India News – २०२३ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर? ईएसपीएनकडून माहिती

एमपीसी न्यूज – २०२३ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अधिकृत तारखा जरी जाहीर झाल्या नसल्या तरीही ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना १५ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदाबाद येथे होण्याची शक्यता मंडळी जात आहे. अहमदाबादच्या विशाल नरेंद्र मोदी स्टेडियम वर हा सामना म्हणजे समर्थकांसाठी जणू सोनेच आहे. अजून काही रिपोर्ट्स असे समोर आले आहेत, ज्याचाने क्रिकेट चाहत्यांचा तोंडाला पाणी सुटेल असे सामने आयसीसी ने यंदाच्या विश्वचषकात ठेवले आहेत.

Pune : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे संभाजी भिडे गुरुजी दर्शन घेणार 

मागच्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना हा न्यू झीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात झाला होता. तो सामना या वर्षी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात करणार आहे. रिपोर्ट्स नुसार भारताचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. आत्ताच संपलेल्या विश्व टेस्ट चॅम्पिअनशिप नंतर, भारत ऑस्ट्रेलिया कडून पराभूत झाल्याने नक्कीच विश्वचषकात बदल घेण्यासाठी उत्तेजित असेल.

उपांत्य फेरीचे सामने व अंतिम सामने यांचे स्थळ जरी अजून ठरायचे असले, तरीही अहवालांनुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच अंतिम सामना होईल असे म्हटले जात आहे. १५ आणि १६ नोव्हेंबर २०२३ या तारखांना उपांत्य फेरीचे सामने होतील तर १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अंतिम सामना ठेवण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.