Pune : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे संभाजी भिडे गुरुजी दर्शन घेणार 

चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला 

एमपीसी न्यूज : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे आगमन थोड्याच वेळात पुणे (Pune) शहरात आगमन होणार आहे.

Pune News – ‘नृत्यात्मन’ कथक नृत्य प्रस्तुती ; ‘नृत्यार्च ‘ संस्थेकडून १७ जून रोजी आयोजन

तर, यापूर्वी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी शिवाजीनगर गावठाण येथील जंगली महाराज मंदिरात राज्याच्या अनेक भागातून आलेल्या धारकर्‍याना मार्गदर्शन केले.
त्यानंतर संभाजी भिडे गुरुजी हे हजारोच्या संख्येने संचेती रुग्णालय येथील पुलाच्या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे आगमन होणार्‍या ठिकाणी मार्गस्थ झाले आहेत. तर, यावेळी संभाजी भिडे गुरुजी हे दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतल्यानंतर ते सोहोळ्यात सहभागी देखील होणार आहे. तर, यावेळी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.