Alandi: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतले माऊलीं संजीवन समाधीचे दर्शन

एमपीसी न्यूज – आळंदी येथे प पू. गोविंददेव गिरी महाराज (Alandi) यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने आज दि.11रोजी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे आळंदी मध्ये आगमन झाले होते.त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले.व पूजन केले.

Alandi: प्रभू श्रीरामा सोबत प्रभू श्री कृष्णाची प्राणप्रतिष्ठापणा होत नाही तोपर्यंत आपल्याला विश्रांती मिळणार नाही-देवेंद्र फडणवीस

तसेच त्यांनी सिद्धेश्वर मंदिरात सिद्धेश्वराचे दर्शन घेतले.यावेळी (Alandi)प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त योगी निरंजनाथ ,विश्वस्त विकास ढगे पाटील व देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते   त्यांना भगवे वस्त्र ,संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती व प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.