Alandi: प्रभू श्रीरामा सोबत प्रभू श्री कृष्णाची प्राणप्रतिष्ठापणा होत नाही तोपर्यंत आपल्याला विश्रांती मिळणार नाही-देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – आळंदी येथे प पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75 व्या (Alandi)वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने आज दि.11रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले होते.

या कार्यक्रमा वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले  पूज्य गोविंदगिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवा निमित्ताने आपण सगळे येथे उपस्थित आहोत.आळंदी नगरीमध्ये ,माऊलींच्या भूमी मध्ये आपण एकत्रित आलोत.
जी एक मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्रा मध्ये आहे,ज्या परंपरेने भागवत (Alandi)धर्माची पताका नेहेमी उंच ठेवली.ज्ञानेश्वर माऊलीं पासून जगद्गुरू तुकाराम महाराजा पर्यँत ही जी परंपरा आहे त्या परंपरेचा आशीर्वाद घेण्या करिता आपण आलो आहोत.

तसेच ते उपस्थित मान्यवरांच्या पुढे म्हणाले आपल्या मनातील एक इच्छा  पूर्ण झाली आहे.प्रभू श्रीरामाचे मंदिर तयार झाले.रामलल्ला चे प्राणप्रतिष्ठापणा झाली.परंतु मी जाणून आहे जोपर्यंत प्रभू श्रीरामा सोबत प्रभू  श्री कृष्णाची प्राणप्रतिष्ठापणा होत नाही तोपर्यंत  आपल्याला विश्रांती मिळणार नाही.
बाबा विश्वनाथाने आपला चमत्कार दाखवलेलाच आहे.त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही आहे.मी मानतो,आपल्या सनातन संस्कृतीला पुन्हा एकदा नवीन उंचीवर नेण्यासाठी स्थापना करण्याकरिता जो महायज्ञ चालू आहे,त्या महायज्ञा मध्ये एक मोठ्या समिधेच्या रूपाने प पू गोविंद महाराज  कार्य सातत्यपूर्ण करत आहेत.
कोणत्याही सरकारचे एक पैसा न घेता आपले रामलल्ला भारताच्या जनतेच्या माध्यमातून ते स्थानावर बसले आहेत.

 

 

https://www.youtube.com/watch?v=rdFR0KCX25c&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.