Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ व्याख्यानमाला संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सावित्रीबाई फुले महिला (Talegaon Dabhade)महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ ही व्याख्यानमाला संपन्न झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यामाने या व्याख्यानमाला आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांचे मानसिक आरोग्य, महिलांची उद्यमशीलता व आर्थिक स्वावलंबन अशा विषयांवर या व्याख्यानमालेत व्याख्याने झाली. तसेच महिलांनी चूल आणि मूल एवढाच विचार न करता उन्नतीसाठी खंबीर झाले पाहिजे, असे सांगण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सावित्रीबाई फुले महिला(Talegaon Dabhade) महाविद्यालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यामानाने विद्यार्थी विकास मंडळा अंतर्गत दि 7 व  8 फेब्रुवारी 2024 ‘निर्भय कन्या अभियान’ व्याख्यानमालेचे व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या  व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांनी केले.
आपल्या उद्घाटन पर मनोगतात ते म्हणाले विद्यार्थिनींसाठी रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. विद्यार्थिनींनी निर्भय झाले पाहिजे. निर्भय कन्या अभियानातून विद्यार्थिनी सक्षम होण्यास मदत होईल असा मला विश्वास वाटतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रामध्ये तळेगाव मधील आंतरराष्ट्रीय पातळी पर्यंत महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात कार्य केलेल्या शिल्पा कशेळकर यांनी ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावरती विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.वेगवेगळ्या कृतीतून हसणे रडणे शांत राहणे यातून आपले मानसिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी कशाप्रकारे उपयोगी ठरेल हे विद्यार्थिनींना सांगितले.
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रामध्ये संतोष वंजारी यांनी ‘महिलांचे उदयमशीलता व आर्थिक स्वावलंबन’ या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्रामध्ये त्यांनी विद्यार्थिनींना आर्थिक स्वावलंबनासाठी मार्गदर्शन केले व त्यात घ्यावयाची दक्षता यासाठीचे सखोल मार्गदर्शन केले.
दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्रांमध्ये तळेगाव दाभाडे येथील दामिनी पथकाच्या महिला पोलीस अंमलदार श्रीमती सुनंदा जाधव यांनी महिलांसाठीचे स्वरक्षणाचे धडे या विषयावरती विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले विद्यार्थिनींनी स्वावलंबी व सबल बनवण्यासाठी लक्ष द्यावे यासाठी प्रेरित केले. अलीकडील महिलांनी चूल आणि मुल यामध्ये न अडकता स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रयत्न करावे शिक्षण घ्यावे आपले ध्येय ठरवावे. महाराष्ट्रातील थोर महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे.
स्वसंरक्षणासाठी शारीरिक क्षमतेसाठी व्यायाम आहार आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींची काळजी मुलींनी घेतली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.  विद्यार्थिनींनी आपल्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींपासून दूर राहून यशस्वी होण्यासाठी अचूक प्रयत्न केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर त्यांच्या सहकारी वैशाली कंद यांनी देखील विद्यार्थिनींशी संवाद साधला त्या म्हणाल्या आपल्या आईचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून झाशीच्या राणीसारखे शूर आणि धाडसी झाले पाहिजे.अडचणीच्या काळात 112 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून आमची मदत घ्यावी.
या व्याख्यानमालेच्या चौथ्या सत्रात श्री प्रफुल कवळे यांनी विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण दिले. त्यांच्या कराटेचा उपयोग विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी नक्कीच होईल. या व्याख्यानमाले मध्ये सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनीं  उपस्थित होत्या.प्रशिक्षणाबद्दल विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास मंडळाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत मुजळगेकर यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ कसबे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.