३ फेब्रुवारी : दिनविशेष

What Happened on February 3, What happened on this day in history, February 3. See what historical events occurred, which famous people were born and who died on February 3.

३ फेब्रुवारी : दिनविशेष

३ फेब्रुवारी – महत्वाच्या घटना

  • १७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
    १८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
    १९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
    १९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.
    १९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.

३ फेब्रुवारी – जन्म

  • १८२१: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९१०)
    १८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३)
    १८८७: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.
    १९००: रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)
    १९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.

३ फेब्रुवारी – मृत्यू

  • १४६८: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.
    १८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)
    १९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८५६)
    १९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.