लोणावळा पोलिसांची दोन महिन्यात 925 वाहनांवर कारवाई

3 लाख 29 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यात तब्बल 925 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 29 हजार 400 रुपयांची दंड वसूली केली. यामध्ये विना हेल्मेट वाहने चालविणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. तब्बल 287 दुचाकी चालकांवर कारवाई करत 1 लाख 44 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या 46 वाहनांवर कारवाई करत 50 हजार दंड वसुली, विना परवाना वाहन चालविणार्‍या 39 वाहनांवर कारवाई करत 20 हजार 400 रुपये दंड, ट्रिपल सिट वाहने चालविणार्‍या 177 वाहनांवर कारवाई करत 36 हजार 200 रुपये दंड, परवाना जवळ न बाळगणे 125 वाहनांवर कारवाई व 25 हजार 400 रुपये दंड, मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे 11 जणांवर कारवाई करत 2200 रुपये दंड, फॅन्सी नंबर प्लेट असणार्‍या 16 वाहनांवर कारवाई व 4 हजार 700 रुपये दंड, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणार्‍या 184 वाहनांवर कारवाई करत 45 हजार 700 रुपये दंड तर दारू पिऊन वाहन चालविणार्‍या तब्बल 40 जणांवर खटले दाखल करण्यात आले.

लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश माने, अनंत रावण, सुनील मुळे, पोलीस नाईक सामिल प्रकाश, जीवन गवारी, पोलीस मदतनीस दर्शन गुरव, सतिष ओव्हाळ, अंकूश गायखे, प्रकाश मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.