धिरुभाई कल्याणजी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

एमपीसी न्यूज – लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. धिरुभाई टेलर यांना विदर्भ कला साहित्य परिषदेच्या वतीने सामाजिक कार्याबद्दलचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन नागपूर येथे गौरविण्यात आले.

ऑक्सफर्ड स्पिकरर्स अॅकेडमीचे कार्यकारी संचालक डॉ. संजय रगातते, जितेंद्र दीक्षित, डॉ. वंदना बेन्झामिन, डॉ. मिलिंद वाचनेकर, बलिता अगरवाल यांच्या हस्ते कल्याणजी यांना सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. पुरुषोत्तम भोंडे, डॉ. जयंत पानसरे, संयोजक बाळासाहेब धंदरे, डॉ. वीना सहित आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याणजी यांना सामाजिक कार्यासाठी मिळालेला हा 124 वा पुरस्कार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.