Talavade : गाळ्याला कुलूप लावले म्हणून भावांकडून बहिणीला बेदम मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांच्या आईने त्यांच्या मालकीच्या गाळ्याला कुलूप लावले होते. गाळ्याला कुलूप का लावले याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.
तर लोखंडी पट्टी व पीव्हीसी पाईप यांनी पाठीवर पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नसून, पोलीस तपास करत (Talavade) आहेत.